Increased has my treasure
वाढले माझे धन
वाढले माझे धन चौऱ्यांशी पटीने
मोहोराने बहरला आम्रवृक्ष;
हर्षीत असे नदीच्या काठी देव
छान उद्याची सकाळ घडवीत;
दूरच्या गावाहून येति गाणपक्षी,
स्वर अनिर्वचनीय स्तब्धतेतून;
लाभे खोल अर्थ काव्यरचनेला,
कधीही येईना सांगता ते सांगे;
देवघरात मांडीला सुरेख फुलोरा
विश्वाभरी पसरे त्याचाचि स्वाद;
लावुनी गंध भाळी कमावले हे धन,
धन्य धन्य ती पूर्णा आराधनेची.
२० एप्रिल २०२५



Leave a comment