Bundles of tender gram bushes
टहाळाच्या जुड्या
न्याहाळूनि त्यांचे हसरे कोवळे हिरवेपण
आणल्या शेतातून टहाळाच्या जुड्या;
त्यांच्या मधुर दूधमय आनंदात झाले
आमंत्रित सौम्य चांदणेही ओलेचिंब;
पाहता पाहता धावे नवीनच धारणा,
साफल्याचा लहानसा प्रेमळ ओढा की;
घाई मौल्याची बाळगलेली उत्सुकता
पर्वताचा उल्हास सांगण्या सागरास;
इच्छुक टवटवीतपणा वाढे वाढे
अहोरात्र साधण्या अपूर्व कायाकल्प;
प्रसन्नतापूर्वक होई जीवनाचे सार्थक,
उगवे हर्षित टहाळ वर्धक प्रकाशात.
19 April 2025


Leave a comment