The Word of Fate
संकेताचा शब्द
सकाळी सकाळी घेऊनि पहिले उड्डाण
आणिला संकेताचा शब्द नारद श्रेष्ठांनी;
असे तो विधात्याच्या निर्णयाने घट्ट
होणार त्यातून सुरुवात नव्या युगाची;
संपल्यानंतर ऋतुंचे चक्र मृत्यु अटळ
नेई त्याच्या अंधारा घरी प्रेमाच्या आत्म्यास;
योजना असे तेथे खोल गूढ भविष्याची
दैवावर विजय मिळवून दिव्यत्व आणण्याशी;
म्हणूनच ती अवतरली क्रियाशील भूलोकी,
ईश्वरी, मानुनी तिच्या अधिष्ठात्याचा संकल्प;
ओझे उचलुनी जडत्वाचे, भारी अज्ञानाचे,
कठोर दुःख जिंकले तीव्र योगसामर्थ्याने;
मागे वर समोर जाउनी विराट पुरुषाच्या,
होऊ दे, हे भगवंता, तुझाच जन्म इथेही;
आनंदातुनी विस्तारण्यास देही प्रज्वलता
पाहिजे दिव्य जीवन पृथ्वीतलावरी.
१९ एप्रिल २०२५


Leave a comment