To be manifold — अनेकत्वाची धारणा
अनेकत्वाची धारणा
संसार करण्याकरिता तर आलो मी इथे
ठेउनी बाजूस माझे न बदलणारे चिरत्व;
वाढती विपुलता सगळीकडे, वाढतेपण,
विस्तार सर्वही दिशां, चंदेरी प्रवाळ निळ्या;
सागरात उडी शोधण्या त्याची अद्भुतता,
हाती मृत्यू घेऊनि आरोहण सप्त शिखरि;
ऐकता अनाहत शांत स्वर नाद आंतरीचे
दिसे प्रकाशमय निराकार स्तब्धता;
तिच्याही पलीकडे आहेत अनंत रूपे
येण्याकरता बाळगूनी उत्साही अपेक्षा;
अहो मोठा खटाटोप तेच घडविण्यार्थ,
हा प्रपंच मांडीला वसविण्यास अनेकत्व;
पसारा नव्हे असावी आनंदाची विविधता,
कारणीभूत हीच घट्ट इच्छा, हाच संकल्प;
शतपरिमाणांसह उभी असे ही रचना
एकाच रंगातुनी पसरे असंख्य धृड रंग;
घेऊनि परम चैतन्य अंगी अंगी ठरे
चैतन्याचेंचि अंश प्रखर प्रज्वलतेचे;
संसार करण्याकरिता तर आलो मी इथे
न पडता संसारात साधण्या संसारत्व.
१५ एप्रिल २०२५
सोऽकामयत । बहु स्यां प्रजायेयेति ।
The Spirit desired of old, “I would be manifold for the birth of peoples.” — Taittiriya Upanishad
The featured image is of Jaggery Lumps, — गुळाच्या भेल्या — each one with its own uniqueness and individuality.

Leave a comment