Oh yes, I have understood this deam

Oh yes, I have understood this deam

By

/

1–2 minutes

read

हे स्वप्न मला कळले

दुःख क्लेश न उरले अज्ञानाचे

बंधने तुटली संकीर्ण ह्रदयातील;

जाउनी सगळी बोचरी क्षुद्रता 

भूमिगत खोल सापडे रत्नभांडार;

काळोखाच्या गुहेत लख्ख उजेड 

हर्षित कोजागिरीच जशी काही असे;

अवतरे सौंदर्यमयि आल्हादिनी 

नुपूरांच्या झुणझुणित डोले सारी सृष्टी;

विद्रुपता नसे कुठल्याही भावनामधे 

नसे कुठेही तुच्छ खोटी प्रेम-माया;

फळाफुलांनी लदली भरगच्च बाग 

स्वर जाती दूरवरी घेऊनी स्वैर पंख;

पण हे कोडे मला कळलेच नाही,

अश्वाची धाव अग्निबाणाच्या गतीची;

जे दिसते त्याच्या खूप पलीकडे, खूप, 

असे पोहोचणारी योगचक्षूची दृष्टी;

अद्भुततेच्या पुढे आहे मोठा विस्तार, 

आनंदाचा, समृद्धीचा, दिव्यत्वाचा;

चैतन्य धारण करी इच्छित रूपें 

आहेत तेथे ज्ञानीजन अग्नितेजाचे;

म्हणूनतर घेतला मी जन्म मृत्यूलोकी 

स्वप्न घडवीत घडवीत गाठण्या अमरत्व;

अहो हीच तर सार्थकता निर्मितीची 

प्रयास नसे तो, आनंद आविष्काराचा।

१३ एप्रिल २०२५

“For Decades I Have Been Either Not Understood Or Misunderstood.”

Carl Jung to Jolande Jacobi

Leave a comment