The auspicious windfall
प्रभु इच्छा — हाचि संकल्प
निर्जिवत्व नव्हे जागृत स्तब्धता
देहाचे समर्पण, काही न ठेवतां ।
नसे संकल्पना, नसे गंभीर भावना
फक्त क्रियाशील उज्ज्वल चेतना ।
ज्याचे व्हावयास पाहिजे त्याचेच
गंगेच्या जळाचे अर्घ्य गंगेचेच ।
घोर अंधाराचे ओझे नाहिसे झाले
पण ते होते उद्देशानेच भारलेले ।
काळोखाच्या दरडीतले घबाड
नाही कोणत्याही नजरेच्या आड ।
निर्वाणाची हाक, अस्तित्वाचा शोध
शून्यातले सामर्थ्य रहस्यमय बोध ।
प्रभु इच्छा — हाचि संकल्प, हाचि ध्यास,
मंत्र नवप्रकृतीचा अजर जोपासण्यास ।
28 March 2025

Leave a comment