Comes she the most superior Executrix

Comes she the most superior Executrix

By

/

1–2 minutes

read

येई क्रियाशील श्रेष्ठा

येई क्रियाशील श्रेष्ठा ब्रह्मपुरीहुनि  

योगियाचा महा आदेश घेऊनि ।

गर्द उत्साहाने मोहरले आम्रवन 

उत्स्फूर्त कोकिळ गायी तिचे गुणगान ।

जणू काही पेरले तिनेच नकळत

सोनियाचे बी नांगरलेल्या शेतात ।

उगवे अग्निसत्त्वाचे धनधान्य 

नवतनुचे तेजःपुंज अमृत-अन्न ।

येई विपुलता तिच्या आगमनाने 

हर्षभरित सौंदर्य तिचेच असणे ।

अगाध दिव्य अवतरे मृत्युप्रांते

आविष्कारे संकल्पिले होते ते ।

देहरूप बदले चेतनेप्रमाणे 

विधात्याची इच्छा तिच्याच करणीने ।

11 March 2025

Leave a comment