The secret of moonlight

The secret of moonlight

By

/

1–2 minutes

read

The secret of moonlight

चांदण्याचे गुपित

आली अंगणात रुपेरी चांदणी

नेसुनि केशरी झगझगीत पैठणी ।

माणिक-मोत्यांचा हार गळ्यात 

मिष्किलता गालीच्या खळीत ।

पैंजण पायात ठरवी कालगती 

रागसुरात चाले चाले नियती ।

भविष्यवाणीने सांगितली थोरवी, 

वसे सर्वत्र ऋतंभरा, गावोगावी ।

म्हणूनच आले मी अंगणात

चांदण्याचे गुपित उकलीत ।

सांगे ती, आंतरात  जशी मी जाई

प्रज्ञा तिथे देखील प्रत्ययास येई ।

ऐश्वर्य लेवूनी ऐश्वर्यच वाढे 

विपुलता इथे तिथे चोहीकडे ।

7 March 2025

Leave a comment