It has to be here
हवे ते इथलेच
जे सांगायचे होते ते सांगून झाले,
पण होते ते अंतरावरील, पलीकडले ।
हवे ते इथलेच, हिरव्या रानांचे,
गुराढोरांचे, वाहत्या नदीनाल्यांचे ।
मुक्ति असावी रामरगाड्यापासून
जन्म-मृत्युचे जड बंधने तोडून ।
पाहिजेत साखळ्या निखळलेल्या,
अज्ञानाच्या सीमा ओलांडलेल्या ।
तर खरी होई जीवनाची सुरुवात
अग्नि घेई सर्व त्याच्याच हातात ।
हवे ते इथलेच, आनंदाने दाटलेले,
बुधवारच्या बाजारात गजबजलेले ।
स्वीकारायचे आहे गूढ भूमीमधील
शोधण्याशी मूल्ये दगडामातीतील ।
5 March 2025

Leave a comment