The arrival of Agnishikha — Flame

The arrival of Agnishikha — Flame

By

/

1–2 minutes

read

अग्निशिखेचे आगमन 

उंच टेकडीवर आहे माझे घर,

आजूबाजूला सारे हिरवेगार ।

भली मोठी बाग पिछाडीला,

सगळीकडे पक्षी कुतुहलाला ।

नजिकच प्रवाहांची खळखळ,

वाऱ्याच्या हाकांना होकार मंजुळ ।

शब्द ऐकू येई भल्या अज्ञाताचा

अद्भुतातून प्रतिसाद मौल्याचा ।

उलगडले रहस्य महान श्रुतीचे 

दगडाच्या उरात इच्छाशक्तिचे  ।

निश्चित येईल ज्वाला जन्माला 

ख्यातीचा संकल्प साधण्याला ।

बांधला सप्तरंगी पूल आकाशात 

आणि शिरे अग्निशिखा घराघरात  ।

27 February 2025

Leave a comment