माझे पंख आले आकाशातून
माझे पंख आले आकाशातून
आनंदाचा छंद निळा घेऊन ।
थवेच्या थवे उत्फुल्ल कल्पनेचे
शून्यातून पसरे विश्व संपन्नतेचे ।
भरारी उत्तरेस दक्षिणेस
चोहीकडे घेत रसांचा रस ।
मुग्ध झुळूक वाऱ्याची जांभळी
झरण्याची प्रसन्नता ती निराळी ।
नदी नाले पुष्कर तळे अहो हे सर्व
बृहत् सागराचेच अनोखे कर्तृत्व ।
रात्री रंगले स्वप्न तारकांचे
जागेपणी रसाळ काव्य उद्याचे ।
आणि कालांतराच्या प्रहरी
विस्मयाचा गोडवा येई भूवरी ।
21 February 2025
Featured image Matrimandir on the Mother’s Birthday, 21 February 2025. Courtesy Tine

Leave a comment