The sun of the sky in the courtyard

The sun of the sky in the courtyard

By

/

1–2 minutes

read

गगनातला सूर्य अंगणात आला 

गगनातला सूर्य अंगणात आला 

दिव्य झेपेने मोठा संकल्प साधला  |

चमत्कार हा निश्चित नसे अद्भुत

अहो उमले सोनचाफा वाळवंटात ।

बहिरे जडत्व ऐके गाणं मधुर

शतकोटी स्वरांचे देखणे मंदिर |

होती प्रेरणा योगी अग्नीची

प्रखर तपश्चर्या वर्षावर्षांची  |

गूढ शून्यात रूप प्रज्वलीत 

कठोर दगडात प्रेरित ज्योत |

संसार नसे पण प्रपंच करारी 

अमर म्हणुनच मृत्यू स्वीकारी |

इथेतिथे सर्वत्र  वास्तव्य त्याचे 

देव फेडी जड ऋण धरतीचे |

19 February 2025

The featured image is a painting by Huta, Savitri Book XI #27

Leave a comment