येई शुभांगी
इथे तिथे जाई जुई मोगऱ्याचा उल्हास
कोण म्हणे हा तर भ्रम, हा तर आभास?
खळखळा वाहे स्वरास्वरांचा आनंद
अद्भूत महाकाव्याचा आल्हादिक नाद |
नसे खोटेपण, अस्तित्व हे केवळ सत्याचे,
माळरान दरीडोंगर सर्वत्र वास्तव्याचे |
अणुरेणूत तीच प्रतिष्ठा, तोच थोरलेपणा,
प्रफुल्लित जशी असे ही हसतमुख प्रेरणा |
सप्तगंगेच्या काठी बसली महापंगत
आवडीचेच पक्वान्न, सुगंधी केशरभात |
दीप्तिवन्त वरुण इंद्र अग्नि सवितृ भग मित्र
प्रसन्नतेचा ध्वनी घुमे नवगायत्रीचा सर्वत्र |
उधळीत गुलाल येई शुभांगी मंगलदायिनी
अमरत्व श्रेष्ठतेचे वाढवित ह्या मृत्युस्थानी |
१३ फेब्रुवारि २०२५
The featured image is a painting by Huta, Savitri Book One Canto Two.

Leave a comment